निरंजन आगाशे - लेख सूची

स. ह., चौसाळकर आणि राष्ट्रवाद

स. ह. देशपांडे यांचे ‘परंपरा, आधुनिकता आणि राष्ट्रवाद’ या विषयावरील दोन लेख आणि त्यावरील प्रा. अशोक चौसाळकर यांची ‘डॉ.स. ह. देशपांड्यांचा राष्ट्रवाद’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेली प्रतिक्रिया वाचली. राष्ट्रवाद म्हटले की काही आक्षेपांचा पाढा वाचायचा असा एक प्रघातच पडला आहे. ही प्रतिक्रिया नेमकी त्याच स्वरूपाची आहे, म्हणून मला या विषयासंदर्भात जाणविणार्याा काही बाबी येथे नोंदवीत …

समान नागरी कायद्यावरील आक्षेपांचे साधार खंडन

वैयक्तिक कायदे इहवादी असले पाहिजेत हा विचार स्वीकारण्याची मानसिक तयारी हिंदू समाजाप्रमाणे मुस्लिम समाजाची अद्याप झाली नाही. परंतु पहिले पाऊल म्हणून ‘हिंदू कोड बिल’ आणले आहे. पुढचा कार्यक्रम मुस्लिम समाजाला शिक्षित जागृत करणे हाच असेल. समान नागरी कायद्यास अनुकूल वातावरण निर्माण करण्याची माझी इच्छा आहे.” हिंदू कोड बिलावरील चर्चेला उत्तर देताना पंडित नेहरूंनी हे स्वच्छपणे …

राष्ट्रवादाच्या उठावाची माहितीपूर्ण चिकित्सा

जगाच्या नव्या रचनेत राष्ट्रवादाचे स्थान काय राहील, हा प्रश्न सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासकांना वारंवार पडतो. विशेषतः दुसर्यार महायुद्धानंतर ही चर्चा सुरू झालीआणि इतिहासाच्या प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यानंतर या चर्चेने जोर धरलेला दिसून येतो. सुरुवातीला दळणवळणक्रांती आणि आर्थिक-सांस्कृतिक सहकार्य यामुळे राष्ट्रीय ।।। अस्मिता पुसट होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. ‘बहुराष्ट्रीय भांडवलशाहीमुळे राष्ट्रवादाचा अस्त होईल, असे काहींना वाटत …

पुस्तक-परिचय : भारताची फाळणी टाळता आली असती?

India’s Purtition: Process, Strategy and Mobilization,संपादक मुशीरुल हसन. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, १९९३. मूल्य रु. ४८५/-विसाव्या शतकातील भारतातील घडामोडींकडे नजर टाकली, तर फाळणीने इतिहासकारांसमोर जेवढी प्रश्नचिन्हे निर्माण केली, तेवढी क्वचितच दुसर्‍या कोणत्या घटनेने केली असतील. स्वातंत्र्याचा सुवर्णक्षण दृष्टिपथात येत असतानाच पाहता पाहता तोआनंद एका भीषण, रक्तरंजित घटनेने काळवंडला जावा, ही एक शोकांतिकाच होती. विघटनाच्या या कड्यापर्यंत …

राष्ट्रवाद की संस्कृतिसंघर्ष ?

शीतयुद्धाची अखेर झाल्यानंतर जगातील राजकीय सत्तासमतोल बदलला त्याचबरोबर अर्थकारणातही स्थित्यंतरास सुरुवात झाली. जागतिक व्यापार खुला करण्याच्या प्रक्रियेने जोर धरला. या पार्श्वभूमीवर आर्थिक सिद्धांतांची पुनर्तपासणी करण्यात येऊ लागली आहे. त्याचप्रमाणे राजकीय तत्त्वज्ञानांचीही फेरमांडणी करण्याचे प्रयत्न होऊ लागले आहेत. सोव्हिएत संघराज्याचा अस्त, त्यानंतर येल्त्सिन यांनी पाश्चिमात्यांकडे केलेली आर्थिक मदतीची मागणी, शस्त्रास्त्रकपातीचे करार, ‘गॅट’ करारावर झालेल्या स्वाक्षऱ्या -या …

भोळे यांचे परीक्षण निराशाजनक

सावरकरांचे समाजकारण : सत्य आणि विपर्यास या ग्रंथावरील श्री. भा. ल. भोळे यांचे परीक्षण उत्सुकतेने वाचायला घेतले. सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाच्या एका काहीशा दुर्लक्षित पैलूवर प्रकाश टाकणारा, स्वतंत्र दृष्टीने लिहिलेला हा संशोधनग्रंथ, आणि तोही एका ताज्या दमाच्या व नवोदित अभ्यासकाने लिहिलेला; त्यामुळे ही उत्सुकता वाटत होती. शेषराव मोरे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांचे प्रा. भोळे यांनी साधार खंडन …